भाजपा शहराध्यक्ष काटे यांनी टोचले नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे कान..!

0
5

 पिंपरी,दि. ७ (पीसीबी) : काल भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहरातील प्रदेश व जिल्हा पदाधिकारी व नगरसेवक यांची महत्वाची बैठक संपन्न झाली.या बैठकीत गेल्या दोन महिन्यात झालेल्या कार्यक्रमांचा आढावा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी घेतला.
शत्रुघ्न काटे यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर यशस्वी कार्यक्रमांचा धडाका लावला आहे.
पक्षाचे कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्या बरोबरच त्यांचे संघटनेत मोठे सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टीने कठोर पावले उचलल्याचे स्पष्ट झाले आहे कारण गेल्या चार दिवसात जिल्हा समिती गठीत करण्यासाठी त्यांनी तीनशे पेक्षा जास्त कार्यकर्त्यांच्या समक्ष मुलाखती घेतल्या व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
त्यामुळे काल झालेल्या बैठकीत त्यांनी लाभाची पदे घेणाऱ्या पण संघटनेच्या कामात न येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे कान टोचले व म्हणाले की जे कार्यकर्ते पक्षसंघटनेचे प्रामाणिकपणे कार्य करतात व ज्यांनी पक्षसंघटनेत काम करण्यासाठी मुलाखत दिली त्याच कार्यकर्त्यांना जिल्हा समितीत प्राधान्य दिले जाणार तसेच जे नगरसेवक, ज्यांना लाभाची पदे मिळाली आहेत किंवा जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी जर पक्षसंघटनेचे उतरून काम केले तरच त्यांचा पदासाठी किंवा उमेदवारीसाठी विचार केला जाणार आणि जे संघटनेचे काम करणार नाहीत व उमेदवारी आणि पदाकरिता पुढे पुढे करतात त्यांची सर्व माहिती पक्षश्रेष्ठींना कळविली जाईल त्यामुळे भविष्यात ज्यांना उमेदवारी पाहिजे किंवा लाभाची पदे हवी असतील त्यांना पक्षसंघटनेत काम करावे लागेल व संघटनेचे काम करीत असताना रिसल्ट देखील द्यावा लागेल तरच त्यांचा विचार केला जाईल असे शहराध्यक्ष काटे यांनी निक्षून सांगितले शिवाय पदे किंवा उमेदवाऱ्या मिळविण्यासाठी कोण कोणाच्या जवळचा असो किंवा लांबचा हे समीकरण भाजप सारख्या संघटनेत चालत नाही मी देखील चालू देणार नसल्याचे हे सांगण्यास ते विसरले नाही.