भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल शहरात आनंदोत्सव साजरा

0
51


पिंपरी, दि. 04 (पीसीबी) : भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) भाजपतर्फे आज, बुधवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटून जल्लोष साजरा केला. चाफेकर चौक – चिंचवड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी आणि भोसरी या तिन्ही विधानसभा परिसरात दुपारी 12.00 वाजता शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

यावेळी, भाजपा कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी सरचिटणीस नामदेव ढाके, संजय मंगोडेकर, सरचिटणीस अजय पाताडे, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळुराम बारणे, प्रदेश युवा मोर्चा चिटणीस तुषार हिंगे, युवा मोर्चा प्रदेश सदस्य अजित कुलथे मंडल अध्यक्ष राजेंद्र बाबर, सोमनाथ भोंडवे, माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, नगरसेविका अनुराधा गोरखे, योगेश चिंचवडे, उपाध्यक्ष कैलास सानप, मधुकर बच्चे, नेताजी शिंदे, गणेश ढाकणे, नंदू कदम, विशाल वाळुंजकर, निलेश अष्टेकर, देवदत्त लांडे, डॉ तृप्ती देसाई, विजय शिनकर, गणेश वाळुंजकर, सलीम शिकलगार, शितल कुंभार यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याचा आनंद भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जल्लोष करून आजच साजरा केला आहे. उद्या 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील. याचा मनस्वी आनंद शहरातील सर्व कार्यकर्त्यांना होत आहे.