भाजपा पिंपरी चिंचवड प्रभारी पदी ॲड. वर्षा डहाळे

0
423

-सर्वांना सोबत घेऊन, संघटन अधिक बळकट करणार – ॲड.डहाळे

पुणे, दि. २६ (पीसीबी) – भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव ॲड. वर्षा हडाळे यांच्यावर पिंपरी चिंचवड (जिल्हा) प्रभारी म्हणून विशेष जबाबदारी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनुकळे यांनी दिली आहे. नियुक्तीचे पत्र आज झालेल्या बैठकीत देण्यात आले. प्रभारी म्हणून काम करत असताना, जिल्ह्यात प्रवास करून पक्ष संघटन अधिक बळकट करण्याची विशेष जबाबदारी असणार आहे.

ॲड. हडाळे या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेल्या कार्यकर्त्या असून, त्यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या सचिव, महिला आघाडी आदि विविध पदांवर यशस्वी काम केले आहे. त्यांच्या संघटनात्मक कार्याची दखल पक्षाने घेऊन त्यांच्यावर गुजरातच्या अंकलेश्‍वर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. या मतदारसंघात ईश्‍वरभाई पटेल हे ४५ हजार मताधिक्याने विजयी झाले होते. या मतदारसंघात ॲड.हडाळे यांनी सलग तीन महिने प्रवास करून पक्षसंघटन मजबूत केले होते. याबरोबरच त्यांनी दिल्ली (लोधीनगर), उत्तरप्रदेश (वाराणसी) या विधानसभा मतदारसंघात विशेष कामगिरी करत दोन्ही मतदारसंघात पक्षाला विजय मिळवून दिला होता. तसेच पंढरपूर, कोल्हापूर आणि नांदेडच्या विधानसभा पोटनिवडणुकीत विशेष कामगिरी केली होती.

‘‘पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मी निष्ठापूर्वक पार पाडली असून, प्रत्येक जबाबदारीतून मी पक्षाला विजयी करण्याबरोबरच तळागाळात पक्ष पोचविण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे. नव्या जबाबदारीमध्ये सर्वसामान्य घटक केंद्रस्थानी ठेऊन, मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सबका साथ सबका विकास होण्यासाठी कटिबद्ध असेल‘‘, ॲड. वर्षा डहाळे यांनी सांगितले.