पुणे, दि . 31 – वडगाव बुद्रुक भागातील भाजपाच्या एका नगरसेविकेच्या मुलाने तरुणीला प्रमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिला धमकावून तिचा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
करण दिलीप नवले असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २८ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी वडगाव बुद्रुक परिसरातील एका सोसायटीत राहायला आहे. त्याची आई भारतीय जनता पक्षाची माजी नगरसेविका आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये आरोपी तरुण आणि पीडितेची ओळख झाली. दोघेही सोबत व्यायामशाळेत जात असे. त्यांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर आरोपीने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पीडितेचा स्वत:चा व्यवसाय आहे. आरोपी तिला भेटण्यासाठी घरी येत असे. पीडितेने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली होती. मात्र यावर बोलणे त्याने टाळले. दरम्यान, आरोपीचे इतर तरुणींशी देखील प्रेमसंबंध असल्याचा संशय पीडितेला होता. याबद्दल विचारणा केली असता तरुणाने तिला शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच तरुणीने पीडितेला धमकावले. त्यानंतर पीडितेने त्याच्याशी बोलणे बंद केले होते.
या सगळ्या प्रकाराबाबत तरुणीने तिच्या आईला सांगितले. १७ डिसेंबर २०२२ ला तरुणाने तरुणीशी मोबाईलवर संपर्क साधला. मला शेवटचे भेटायचे आहे. न भेटल्यास कुटुंबीयांना संपवून टाकण्याची धमकी त्याने दिली. याबद्दल तरुणीने माजी नगरसेविकेला सांगितले. तेव्हा तिला पुन्हा धमकावले. त्यानंतर आरोपीने पीडितेला भेटून विवाह करण्याचे आश्वासन दिले. विवाहाचे आमिष दाखवून आरोपीने पीडितेवर वारंवार बलात्कार केला. मात्र कुटुंबिय ऐकण्याच्या मन:स्थितीत नसून त्यांचा विवाहास नकार असल्याचे सांगत तरुणाने पीडितेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या.
आरोपीने २०२४ मध्ये पुन्हा बलात्कार केला. पुन्हा तरुणी गर्भवती राहिली. याबद्दल तरुणीने आपल्या घरच्यांना सांगितले. त्यानंतर तरुणाकडे विवाहाबद्दल विचारणा केली असता त्यांच्या पुन्हा वाद झाले. १६ फेब्रुवारी २०२५ ला पीडितेला घेऊन आरोपी आळंदीला गेला. तिथे त्यांनी विवाह केला. गर्भवती असल्याचे माहिती असूनही त्याने पुन्हा बलात्कार केल्याचे पीडितीने फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, आरोपीने पीडितेला पाण्यातून गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे तरुणी घाबरली. काही दिवस ती अहिल्यानगरला आपल्या आजीकडे गेली. १३ मार्च रोजी ती पुण्यात परतली. तिने पोलिसांकडे तक्रार दिली.