भाजपा आमदाराचे काँग्रेस उमेदवाराला क्रॉस व्होटिंग, भाजपामध्ये खळबळ

0
295

जयपूर,दि. १० (पीसीबी) : राज्यात सुरू असलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात पुन्हा एकदा फूट पडल्याचं समोर आलंय. इथं एकेकाळी वसुंधरा राजेंच्या ताफ्यातील आमदार समजल्या जाणाऱ्या शोभाराणी कुशवाह यांनी क्रॉस व्होट केल्यानं भाजपच्या गोटात खळबळ उडालीय. शोभराणी यांनी भाजपच्या घनश्याम तिवारींऐवजी काँग्रेसच्या प्रमोद तिवारींना मतदान केल्याचं सांगण्यात येतंय.

इकडं निवडणुकीत शोभाराणी यांचं मत नाकारलं गेल्यानं चंद्रा यांना यावेळी राज्यसभेची जागाही काढता येणार नाही, हेही दिसून येतंय. उद्योगपती सुभाष चंद्रा यांनी भाजपच्या पाठिंब्यानं राजस्थानमधून राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केली होती. चंद्रा याआधी हरियाणातून राज्यसभेचे खासदार राहिले आहेत.

मिळलेल्या माहितीनुसार, शोभाराणी गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत. त्या बराच काळ पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागीही होत नव्हत्या. शोभाराणी या भरतपूर विभागातील एकमेव आमदार आहेत. पूर्व राजस्थानमध्ये काँग्रेसच्या वर्चस्वानंतर शोभराणी या एकमेव आमदार राहिल्या आहेत. ज्यांनी संपूर्ण भरतपूर विभागात भाजपसाठी धोलपूरमधून एक जागा काढून घेतली होती. पती बीएल कुशवाह धोलपूरमधील एका हत्येप्रकरणी तुरुंगात गेल्यानंतर शोभराणी या पोटनिवडणूक जिंकून राजस्थान विधानसभेत पोहोचल्या. पती बीएल कुशवाह हे बसपचे आमदार होते.