भाजपातर्फे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’उपक्रमाचे आयोजन

0
321

पिंपरी दि. १७ (पीसीबी) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबरपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत 2 ऑक्टोबर या काळात ‘सेवा पंधरवडा’ म्हणून साजरा केला जाणार आहे. या अंतर्गत विविध सेवाकार्य करून पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. याबाबत राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि मंडलाध्यक्षांना सूचना करण्यात आल्या आहेत.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सूचनेनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात ‘सेवा पंधरवडा’ आयोजित केला असून, या कार्यक्रमांमध्ये स्थानिक खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांचा सक्रिय सहभाग असणार आहे.

जिल्हा व मंडल स्तरावर पंतप्रधानांच्या जीवनावर प्रदर्शनी आयोजित करणार येणार आहे. प्रदर्शनी ‘नमो अॅप’वर डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. पंतप्रधानांच्या जनकल्याणकारी योजना व प्रशासकीय कार्यकौशल्याविषयी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. त्यांचा प्रचार-प्रसार करणार येणार आहे. ‘‘ Modi@20. Dreams Meet Delivery’’ या पुस्तकाचा प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली.

युवा मोर्चाकडून जिल्हास्थानी रक्तदान शिबिर…
युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांकडून जिल्हास्तरावर आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, प्रत्येक जिल्हयात दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव आणि उपकरणे यांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच, क्षयरोगाने ग्रासलेल्या व्यक्तीला प्रत्येक मंडल अथवा वॉर्डस्तरावर एक वर्षासाठी दत्तक घेऊन त्यांच्या भोजन, पोषण आणि रोजगाराच्या संदर्भात सेवा कार्य करण्यात येणार आहे. बूथमध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांचे लक्ष, सर्व मंडलांमध्ये दोन दिवसांचा स्वच्छता अभियान कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.प्रत्येक जिल्ह्यात ‘कॅच द रेन’ अभियानासंबंधी जागरुकता. प्रत्येक मंडलात घरोघरी जाऊन जल संरक्षणाचे उपाय संवादाच्या स्वरुपात सांगणार आहेत.

स्वच्छता अभियान जनजागृती…
तसेच, ‘व्होकल फॉर लोकल’च्या माध्यमातून स्थानिक उत्पादने खरेदी, जिल्हयात बुद्धीजीवी संमेलन ,पंतप्रधानांचे व्यक्तिमत्व, व्हिजन, धोरणे आणि यश यांच्याविषयी व्यापक चर्चासत्र, बूथ स्तरावर प्रेरणास्त्रोत पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती 25 सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. यात त्यांच्या जीवनाविषयी चर्चासत्र व रचनात्मक कार्यक्रम, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त 2 ऑक्टोबर रोजी बापूंचे विचार, स्वदेशी, खादी, स्वावलंबन, साधेपणा आणि स्वच्छता याविषयी जागृतीसाठी अभियान राबविण्यात येणार आहे.