भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांचे कारनामे आज उघड करणार

0
77

भाजपच्या चित्रा वाघ यांना राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांचा इशारा

मुंबई, दि. ३० – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपावरुन महाराष्ट्रात नवीन राजकारण सुरु झालं आहे. आपण गृहमंत्री असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी ऑफर दिली होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी केला आहे. त्यांच्या याच आरोपांवर देशमुखांनी पुरावे द्यावेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. या वादात आता भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांचे कारनामे उघड करण्याची धमकी देण्यात आली आहे.

अनिल देशमुखांनी फडणवीसांबाबत पुरावे दिले, तर पुढच्या 3 तासात त्यांचा पदार्फाश करु असं आव्हान चित्र वाघ यांनी अनिल देशमुखांना दिलं होतं. त्यावर शरद पवार गटाच्या महिला नेत्या विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्याकडे पेन ड्राइव्ह आहे, त्यात चित्रा वाघ यांचे कारनामे आहेत असा इशारा विद्या चव्हाण यांनी दिला आहे. “फोटोला फोटोने उत्तर आम्हालाही देता येतं. यात कसला आला पराक्रम अनिलबाबू. अनिल देशमुखांना माझा सवाल आहे, आम्ही तुमच्याकडे पुरावे मागितलेत, ते तुम्ही का देत नाहीय? एकदा तुम्ही पुरावे द्या, मग त्यानंतरच्या तीन तासात तुमचा पदार्फाश करणारे पुरावे आमच्याकडे सज्ज आहेत” असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला. त्याला विद्या चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलय.

“या पेन ड्राइव्हमध्ये चित्रा वाघचे सगळे कारनामे आहेत, चित्रा वाघ काय-काय बोलते आणि काय-काय करते, तिचे कारनामे या पेन ड्राइव्हमध्ये आहेत. 3 वाजता राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये हे उघड करणार. महाराष्ट्राच्या जनतेला तुझं खर रुप दाखवल्याशिवाय विद्या चव्हाण राहणार नाही हे लक्षात ठेवं” अशा इशारा चित्रा वाघ यांना देण्यात आलाय.