भाजपसाठी गुड न्युज, ताज्या अंदाजानुसार मिळणार इतक्या जागा…

0
359

लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी केलेल्या सर्वेक्षणात आश्चर्यकारक निकाल समोर आले आहेत. टाइम्स नाऊ नवभारत या हिंदी वृत्तवाहिनीच्या जन गण का मन या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील आकडेवारी ही महाविकास आघाडीची चिंता वाढवणारी आहे. यासोबतच इतरही अनेक राज्यातील अंदाज या सर्वेक्षणाच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर. टाइम्स नाऊ नवभारतच्या सर्व्हेनुसार, गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा या भाजपच्या खात्यात जाताना दिसत आहेत. तेथे भाजपला 50 टक्के आणि काँग्रेसच्या मतांची टक्केवारी 46 टक्के असल्याचा अंदाज आहे.

सर्वेक्षणानुसार गुजरातमध्ये भाजपला सर्व 26 जागा मिळू शकतात. इथे भाजपला 60 टक्के मते मिळू शकतात, तर काँग्रेसला 32 टक्के आणि आम आदमी पार्टीला 3 टक्के मते मिळू शकतात. दरम्यान, हिमाचल प्रदेशातही सर्व 4 जागा भाजपच्या खात्यात जातील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपची मतांची टक्केवारी ही 56 टक्के असू शकते. तर काँग्रेसला 39 टक्के तर इतरांना 5 टक्के मते मिळू शकतात.

महाराष्ट्रातील नेमकी स्थिती काय?
सर्व्हेनुसार, महाराष्ट्रातील 48 पैकी 36 जागा NDA आघाडीला जाऊ शकतात. ज्यापैकी 29 जागा या भाजपच्या खात्यात जातील असा अंदाज आहे. तर शिंदे गटाच्या शिवसेनेला 5 तर अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, काँग्रेस फक्त एका जागेवरच विजयी ठरू शकते, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 8 जागा मिळू शकतात. सर्व्हेनुसार, भाजपला सर्वाधिक 36 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला 8 टक्के, अजित पवार समर्थकांना 4 टक्के, काँग्रेसला 8 टक्के, शिवसेना ठाकरे गटाला 21 टक्के, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 11 टक्के आणि इतरांना 12 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.