भाजपने ३५ कोटींच्या बनावट नोटा वाटल्या – जानकर

0
91

सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघात तापमानात वाढ झाल्या प्रमाणे राजकीय ट्विस्ट देखील वाढले आहेत. राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या बनावट लोकांनी माळशिरस तालुक्यात बनावट नोटा वाटप केल्याचा धक्कादायक आरोप उत्तम जानकर यांनी केला आहे. बनावट नोटा पाहून माळशिरस तालुक्यातील दुकानदार देखील नोटा स्वीकारण्यास तयार नाहीत, असा गौप्यस्फोट जानकर यांनी केला आहे.

माळशिरस तालुक्यात आणि माढा लोकसभा मतदारसंघात महत्त्वाची भूमिका बजावणारे उत्तम जानकर यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. बनावट सरकारने लोकांना फसविले आहे. बनावट सरकारमधील बनावट लोकांनी माळशिरस तालुक्यात जवळपास ३५ कोटींची बनावट रोकड वाटप केली आहे. माळशिरस तालुक्यात बनावट नोटांची अफवा पसरल्याने दुकानदार कोणताही व्यवहार रोखीने करत नाहीये.

फडणवीसांनी माझं आणि मोहितेंचं ४० वर्षांचं वैर संपवलं, जानकरांनी सगळं सांगितलं. मतदारांनी या नोटा दुकानदाराला दाखवून त्याची शहानिशा करुन पाहण्याचं आवाहन देखील उत्तर जानकर यांनी केलं. त्यामुळे माढ्यात आता नवा वाद उद्भवला आहे.