भाजपने या राज्यातून पुन्हा क्लीन स्वीप

0
141

देश, दि. २ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आले आहेत. या एक्झिट पोलनुसार पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत एनडीए 8 राज्यात क्लीन स्वीप करण्याची शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 9 राज्यात क्लीन स्वीप केलं होतं. त्यापैकी यावेळी एक राज्य भाजपच्या हातून जाणार आहे. 2019मध्ये ज्या राज्यांमध्ये भाजपला क्लीन स्वीप मिळाली होती, त्यापैकी काही राज्य भाजपच्या हातून जाणार आहेत. तर नवीन राज्य या यादीत जोडले जाणार आहेत, अशी शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे.

गुजरात: 26 हरियाणा: 10 हिमाचल प्रदेश: 4 चंदीगड: 1 दिल्ली: 7, अंदमान आणि निकोबार: 1 आंध्र प्रदेश: 21-25 अरुणाचल प्रदेश: 2 दादर आणि नागर हवेली: 0-1 दमन और दीव: 0-1 मिजोरम: 0-1 त्रिपुरा: 2 उत्तराखंड: 4-5 आदी राज्यांतून भाजप क्लिन स्विप करण्याची शक्यता आहे.

सीट व्होटरच्या सर्व्हेनुसार एनडीए अंदमान आणि निकोबार, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, दादरा नागर हवेली, दमन आणि दीव, मिझोराम, त्रिपुरा आणि उत्तराखंडमध्ये क्लीन स्वीप करणार आहे. एक्झिट पोलनुसार एनडीए अंदमान निकोबारच्या एका, आंध्र प्रदेशातील 25, अरुणाचल प्रदेशातील 2, दादर आणि नागर हवेलतील एक, दीव आणि दमनमधील एक, मिझोराममधील एक, त्रिपुरातील दोन आणि उत्तराखंडमधील सर्व पाच जागांवर विजय मिळताना दिसत आहे. एक्झिट पोलनुसार गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, चंदीगड आणि दिल्लीतही एनडीए क्लिन स्वीप करण्याची शक्यता आहे. या राज्यांमध्ये 2019च्या निवडणुकीत भाजपने सर्व जागा जिंकल्या होत्या.

8 एक्झिट पोल एनडीएच्या बाजूने
8 एक्झिट पोलच्यानुसार पोल ऑफ पोल्समध्ये भाजपला 334, काँग्रेसला 136 आणि इतरांना 50 जागा मिळताना दिसत आहेत. आघाडीचा आकडा सांगायचा झाला तर एनडीएला 348 आणि इंडिया आघाडीला 148 जागा मिळताना दिसत आहे. 12 राज्यांचा डेटा अजून आलेला नाही. त्यावरूनही बरीचशी माहिती पुढे येणार आहे.

हिंदी पट्टा भाजपचा
हिंदी पट्ट्यात उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्लीत भाजपला एकतर्फी विजय मिळताना दिसत आहे. या राज्यात भाजपला 90 टक्के जागा मिळतील असा अंदाज आहे. मध्यप्रदेशातील 29 जागांपैकी 28 जागा भाजपला मिळताना दिसत आहेत. राजस्थानमध्येही 23 ते 25 जागा मिळताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशात भाजपच्या जागांची संख्या 69 ते 74 जागांच्या घरात असेल. तर छत्तीसगडमध्ये भाजप 11 पैकी 11 जागा खिशात घालेल असा अंदाज आहे. दिल्लीतही सातही जागांवर भाजपला विजय मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे