“भाजपनेचं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली” संजय राऊतांची बोचरी टीका

0
5

मुंबई, दि. 26 (पीसीबी) : “राजकारणात वैयक्तीक शत्रूत्व असू नये. मात्र, भाजपने राजकारणात वैयक्तीक शत्रूत्वाला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस हे आमचे राजकीय शत्रू आहेत. आम्ही त्यांच्याकडे वैयक्तीक शत्रू म्हणून पाहत नाही”, असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. भाजपच्या हातात सत्ता गेल्यानंतर दिल्लीत नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता गेल्यानंतर कौटुंबिक स्तरापर्यंत शत्रूत्व करण्याचे राजकारण सुरू झाले, असा आरोपही संजय राऊतांनी यावेळी केला.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस, भाजपसह वांद्र्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीकाही केली. महाराष्ट्राला विचारांची आणि राजकारणाची संस्कृती आणि संस्कार आहेत. हे सर्व बिघडवण्याचे काम भाजपने केले आहे, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.

राजकारणात वैयक्तिक शत्रूत्व असू नये. मात्र, भाजपने राजकारणात वैयक्तिक शत्रूत्वाला सुरुवात केली. राजकारणात विचारांची लढाई विचारांनी व्हावी, हा महाराष्ट्राचा संस्कार आणि संस्कृती आहे. राजकारणात भूमिकांवर, विकास कामांवर चर्चा व्हावी. वैयक्तीक हेवेदावे, शत्रूत्व राजकारणात असून नये, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हा संस्कार यशवंतराव चव्हाणांपासून, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यापर्यंत कायम होता. मात्र, भाजपच्या हातात सत्ता गेल्यानंतर दिल्लीत नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता गेल्यानंतर कौटुंबिक स्तरापर्यंत शत्रूत्व करण्याचे राजकारण सुरू झाले, असा आरोप संजय राऊतांनी केला.

राजकीय वैर राजकारणातच ठेवले पाहिजे, ती विचारांची लढाई आहे. त्यात वैयक्तिक शत्रूत्व आणू नये, कोणचेही कुटुंब उद्ध्वस्त करू नये, असे माझं मत आहे. मात्र, दुर्दैवाने भाजप हे सर्व करत आहे. फडणवीस आमचे राजकीय शत्रू आहेत. आम्ही त्यांच्याकडे वैयक्तिक शत्रू म्हणून पाहत नाही, असे संजय राऊत म्हणाले