भाजपच्या हायकमांडकडून शिंदे गटातील पाच मंत्र्यांना हटविण्याचे आदेश

0
342

मुंबई,दि.११(पीसीबी) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत सापडले आहे. त्यामागील कारण म्हणजे सध्याच्या मंत्रिमंडळात समाधानकारक काम न करणाऱ्या शिंदे गटातील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पाच मंत्र्यांना हटविण्याचे आदेश भाजपच्या हायकमांडकडून देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यात पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारातील मंत्र्यांच्या कामगिरीवर नजर ठेवण्यासाठी भाजपची स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आली. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत या मंत्र्यांचा कितपत उपयोग होईल याचा अभ्यास करण्यात आला. ज्यात शिंदे गटातील पाच 5 मंत्री ब्लॅकलिस्टमध्ये आले असून, त्याचा अहवाल भाजप हायकमांडला देण्यात आला आहे.

याबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्त दिले असून ज्यात रोहयो मंत्री संदिपान भुमरे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, अन्न वं औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा समावेश आहे.

या पाचही ज्यांना मंत्रीपदावरून हटवून त्यांच्याजागी इतर आमदारांची निवड करण्याचे आदेश भाजपच्या हायकमांडकडून देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे तीन दिवस अज्ञातवासात गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.