भाजपच्या बैठकीत बड्या नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी.

0
106

खडकवासला, दि. 02 (पीसीबी) : पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. खडकवासला मतदारसंघाबाबत सुरु असलेल्या चर्चेदरम्यान भाजपच्या नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे पक्ष निरीक्षक धनंजय महाडिक यांच्यासमोर हा सगळा प्रकार झाला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या गोटात तर प्रचंड घडामोडी घडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील कालपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. भाजपकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला जातोय. यासाठी पक्षाच्या हायकमांडकडून काही प्रमुख नेत्यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे निरीक्षक त्या त्या मतदारसंघात जावून आढावा घेत आहेत. पण या निरीक्षकांनादेखील आता अडचणींना सामोरं जावं लागत असल्याची माहिती समोर येत आहे. कारण काही मतदारसंघांमध्ये भाजप पक्षातील अनेक नेते इच्छुक आहेत. यावरुन पक्षांतर्गत गटबाजी आणि मतभेद समोर येत आहे. पुण्यात असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे निरीक्षकांसमोरच भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे या घटनेची आता सर्वत्र चर्चा होत आहे.