भाजपच्या कार्यालयाला भीषण आग

0
276

दि २१ एप्रिल (पीसीबी ) – राज्यात लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू असताना मुंबईतून एक मोठी बातमी आली आहे. भाजपच्या मुंबईतील नरीमन पॉइंट येथील कार्यालयाला आग लागली आहे. आग लागल्यानंतर अवघ्या काही वेळातच आग भडकली. त्यामुळे धूर आणि आगीचे लोट पसरले होते. अचानक आग लागल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली.

रविवारचा दिवस असल्याने मुंबईच्या कार्यालयात वेल्डिंगचं काम सुरू होतं. त्यावेळी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. भाजप कार्यालयाच्या (BJP Office Fire) मागच्या बाजूने ही आग लागली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुरांचे लोट पाहायला मिळाले. या कार्यालयामध्ये कुणीही व्यक्ती अडकला नसल्याची माहिती आहे.