भाजपचे संजय काकडे शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात आर्श्चय

0
56

पिंपरी, दि. १० ऑगस्ट (पीसीबी) पुणे : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. पुण्यामधून एक मोठी राजकीय बातमीओ समोर येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यातील त्यांच्या मोदीबाग या निवासस्थानी आहेत. अशातच आज(शनिवारी) सकाळी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू शरद पवारांची भेट घेण्यासाठी मोदी बागेत आले होते. त्यानंतर आता भाजपचे माजी खासदार संजय काकडे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी मोदीबाग परिसरात पोहोचले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात आर्श्चय व्यक्त केलं जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळीच बच्चू कडू यांनी शरद पवार यांची मोदी बागेत भेट घेतली असून त्यांच्याशी चर्चा देखील केली. त्यानंतर आता भाजपचे माजी खासदार संजय काकडे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी मोदीबागेत पोहोचले आहेत. पुण्यातील मोदी बाग या ठिकाणी संजय काकडे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले, त्यांनी शरद पवारांची भेट घेतली असल्याचे समोर येत आहे.भेटीनंतर काय म्हटले संजय काकडे..?

आज संजय काकडे यांनी शरद पवारांची भेट घेतली असून त्यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. संजय काकडे बोलले कि, मी माझ्या वैयक्तिक कामासाठी त्यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून या भेटीत वैयक्तिक कामाबाबत चर्चा झाली आहे. मला माझ्या पक्षांनी याबाबत प्रश्न विचारल्यास मी त्यांना उत्तर देईल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.काकडे पुढे म्हणाले, की माझा मित्र शंकर यांचं काम होतं त्यासाठी मी याठिकाणी आलो होतो. या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही. बच्चू कडूंनी भेट घेतली मात्र, ते कोणत्याही पक्षात जाण्याची रिस्क घेणार नाहीत. मी माझ्या मित्राच्या कामासाठी आलो आहे. माझ्या पक्षाच्या लोकांना माझावर विश्वास असावा. नसेल तर त्यांना मी उत्तर देईल असंही त्यांनी सांगितले.