भाजपचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

0
54

मुंबई, दि. 25 (पीसीबी) : भाजपचे नांदेडचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केले. स्वतः अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले.

नांदेडचे भाजपचे माजी खासदार अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी चे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत पक्षप्रवेश केला आहे.पक्षात प्रवेश करताच राष्ट्रवादीने त्यांना लोहा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.