मुंबई, दि. ३ (पीसीबी) – भारतीय जनता पक्षाचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. पुण्यातल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघावर त्यांची मजबूत पकड होती. त्यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधान झालं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. जगताप हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्त्यापासून आमदारपदापर्यंत त्यांनी चांगलं काम केलं. पिंपरी-चिचवडमध्ये ते लोकप्रिय होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड येथे शोककळा पसरली आहे.
जगताप हे आजारी असताना देखील निवडणुकीच्या मतदानासाठी व्हील चेअरवर मुंबईला आले होते. ते एक निष्ठावंत आमदार होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांना दु:ख पचविण्याची शक्ती मिळावी, अशी सदिच्छा शिंदे यांनी व्यक्त केली.