भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णा दगडु यांचे वृद्धापकाळाने निधन

0
199

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) पिंपरी चिंचवड भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णा दगडु उर्फ मामा शेलार (वय -८५ ) यांचे वृद्धापकाळाने आज पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिशनच्या पदाधिकारी अल्पना रायते या त्यांच्या कन्या होत.

शहरात १९८० पासून भाजप रुजविण्यात त्यांचे योगदान. आहे. चिंचवड स्टेशन मोहनगर येथील हिंदू स्मशान भूमीत सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.