भाजपचे गणेश लंगोटे राष्ट्रवादीत

0
29

दि.२३(पीसीबी)-मोहननगर, काळभोरनगर प्रभागातील भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते गणेश लंगोटे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विशाल काळभोर यांनी आज दुपारी पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

लंगोटे हे गेली पंधरा वर्षे भाजप बरोबर एकनिष्ठ होते. यावेळी उमेदवारी मिळणार याची शाश्वती असतानाच त्यांना डावलून बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना संधी देण्यात आली. अखेर लंगोटे यांनी भाजप सोडला आणि सरळ राष्ट्रवादीत प्रवेश केला. आपल्या सहकारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन नंतर त्यांनी हा निर्णय केला.
विशाल काळभोर यांना यावेळी उमेदवारीची अपेक्षा होती. पक्षाने डावलले म्हणून त्यांनीसुध्दा अजित पवार यांच्याशी संपर्क केला आणि पक्ष प्रवेश केला.