भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतले माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन

0
30

आळंदी, दि. 28 (पीसीबी) : संत ज्ञानेश्वर महाराज 728 वा संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रा 2024 निमित्ताने आज सकाळी भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

देवस्थानतर्फे विश्वस्त भावार्थ देखणे यांनी शाल,हार , श्रीफळ देऊन आमदार चंद्रकांत पाटील यांचा सन्मान केला. यावेळी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, भाजप पदाधिकारी संजय घुंडरे व संकेत वाघमारे उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील यांना विश्वस्त भावार्थ देखणे यांनी कार्तिकी सोहळा व आषाढी वारी, दर्शन मंडप, माऊली मंदिरातील अन्नछत्र, आळंदी देवस्थानच्या मालकीच्या गायरान जमिनीत वारकरी केंद्रित बहु ऊद्देशीय ज्ञानभूमी याविषयी माहिती दिली. तसेच प्रत्येक एकादशीसाठी किती भाविक येतात यांचा तपशील दिला. अन्नछत्र व दर्शन मंडप याविषयी मदत करणार आहोत याविषयी जाहीर केले. दर्शन मंडपाच्या निश्चित जागेबाबत देवस्थान बरोबर बैठक बोलवली जाईल, असे चर्चेदरम्यान सांगितले.