भाजपचा प्रचार कोणत्याही परिस्थितीत नाहीच

0
140

– राष्ट्रवादीचे ४० माजी नगरसेवक, पदाधिकारी आक्रमक
पिंपरी, दि. ४ –
चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळावी, अशी अत्यंत आग्रही मागणी शहरातील ४० वर माजी नगरसेवक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. भाजपचा प्रचार कोणत्याही परिस्थितीत कऱणार नाही, अन्यथा दुसरा पर्याय निवडण्याचा ठराव यावेळी कऱण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून त्या संदर्भात चर्चा कऱणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
पुनावळे येथील ब्लू वॉटर हॉटेलमध्ये आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी ४० जणांच्या उपस्थितीत विशेष बैठकिचे आयोजन कऱण्यात आले होते. आठवड्यापूर्वी एका पत्रकार परिषदेत मयूर कलाटे, प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे आणि विनोद नढे या चौघांनी मिळून पत्रकार परिषदेत हीच मागणी केली होती. नंतरच्या काळात मतदारसंघात माजी नगरसेवक तसेच सर्व पदाधिकाऱी यांना भेटून भूमिक पटवून दिली. मोठा प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी आज स्वतंत्र बैठक घेतली.
यावेळी इच्छुक उमेदवारांपैकी नाना काटे यांच्यासह प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, सतिश दरेकर, आशा सुर्यवंशी, अतुल शितोळे, मनोज खानोलकर, प्रज्ञा खानोलकर संतोष कोकणे, विनोद नढे, राजेंद्र साळुंखे, निलेश डोके, हरिभाऊ तिकोणे, कैलास बारणे, उषा काळे, राजेंद्र जगताप, सुषणा तनपुरे मॅडम, खुळे-रहाटणी, शाम जगताप, बापू कातळे, माऊली सुर्यवंशी, दिलीप काळे, महिला अध्यक्षा सौ. संगिता कोकणे यांच्यासह, पुष्पा शेळके, पौर्णिमा पालेकर, वंदना कांबळे, मीरा कदम, चेतन दुधाळ विद्यार्थी संघटना अध्यक आदी उपस्थित होते.
बैठकित भाजपला जागा असल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची कशी कोंडी झाली आणि त्याचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकित होण्याची भिती व्यक्त करण्यात आली. विधानसभेला कोणत्याही परिस्थिती आम्हाला कमळ चिन्हावर शिक्का मारायचा नाही आणि भाजपचा प्रचार कऱणार नाही. उमेदवार हा घड्याळ चिन्हाचाच पाहिजे, अशी आग्रही मागणी सर्वांनी केली.

चिंचवड विधानसभा राष्ट्रवादीला मिळावी. एक उमेदवार दिला तर त्याचेच काम करायचे आहे. भाजपने कोणताही उमेदवार दिला तर त्याचे काम करायचे नाही. अजितदादांना वारंवार अशी विनंती करणार आणि त्यानंतरही न्याय मिळाला नाहीच तर पर्याय तयार आहे, असेही सांगण्यात आले.
उपस्थितांना नाना काटे, मयूर कलाटे, प्रशांत शितोळ, अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, मीरा कदम यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा पाहून भाजपने संभाव्य उमेदवार शंकरशेठ जगताप यांची उमेदवारी बदलण्याची तयारी दर्शविली असल्याचे ताजी बातमी हाती आली आहे.