भाजपचा जाहिरनामा प्रमुख काँग्रेसमध्ये दाखल

0
284

तेलंगणा, दि. २ (पीसीबी) -भाजपच्या तेलंगणा निवडणूक जाहीरनामा समितीचे अध्यक्ष आणि माजी खासदार जी. विवेक व्यंकटस्वामी यांनी भाजपचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा येथील भाजपला धक्का मानला जात आहे. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.केंद्रीय मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी यांना पत्र लिहून विवेक यांनी आपल्या निर्णयाची माहिती दिली. काहीच दिवसांपूर्वी आधी भाजपचे वरिष्ठ नेता कोमाटिरेड्डी राज गोपाल रेड्डी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी विवेक म्हणाले की, ‘बीआरएस’ सरकार जनतेसाठी काम करत नसून, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कुटुंबासाठीच काम करत आहे. त्यांच्या विरोधात सर्वानी एकजुटीने काम करण्याची गरज आहे असे ते म्हणाले.