भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांचा चेहरा चर्चेत

0
245

मुंबई, दि. १६ (पीसीबी)- भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांचा चेहरा असू शकतो, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी भाजपकडून निवडणुकीत खेळी खेळली जात आहे. तसेच काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा होण्यासाठी बाळासाहेब थोरात देखील प्रयत्नशील असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात, अशी लढत होईल. देवेंद्र फडणवीस यांना आवडणार नाही पण भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा राधाकृष्ण विखे पाटील होऊ शकतात. त्याचबरोबर जी काही नगरमध्ये खेळी झाली. त्यावरुन बाळासाहेब थोरात यांनी देखील काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा होण्याची इच्छा झाली आहे,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीच्या चर्चा रंगली आहे. याबाबत दोन्ही नेत्यांच्या बैठका देखील झाल्या आहेत. यावर देखील प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेत वक्तव्य केले.”बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा एकत्र होता. उद्धव ठाकरे यांनी माझ्या आजोबांचे हिंदूत्व मी घोतोय, असे जाहीर केल्यामुळे धर्म सुधारणेची चळवळ सुरु झाली. बाळासाहेबांचे मताचे राजकारण होते”, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मी चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करायला तयार आहे. मी त्यांना परवानगी देखील मागीतली आहे. शिवाजी पार्कवर ५ लाख लोकांसमोर त्यांचा सत्कार करेल. कारण ते खरे बोलले कोणी कोणी लोकांकडून पैसे घेऊन आपल्या संस्था उभ्या केल्या. मात्र त्यांनी एक मीस केलं की त्यानंतर उभ्या केलेल्या संस्था ह्या खोक्याच्या स्वरूपातून उभ्या केल्या. हे त्यांनी सांगितले नाही.”