भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मामावर गुन्हा

0
291

सांगवी, दि. १९ (पीसीबी) – भाचीला लग्नाचे आमिष दाखवून मामाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार सांगवी परिसरात उघडकीस आला आहे. हा प्रकार ७ जुलै २०१९ ते २३ डिसेंबर २०२२ या कालावधीत सांगवी आणि बाणेर येथे घडला.

याप्रकरणी ३४ वर्षीय भाचीने ३७ वर्षीय मामाच्या विरोधात मंगळवारी (दि. १७) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही आरोपीची भाची आहे. आरोपी मामाने फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून तिच्यावर तिच्या घरी आणि वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.