भागीदारी न दिल्याने मागितली खंडणी

0
209

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – वाहन पार्किंग व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाने त्याच्या व्यवसायात भागीदारी न दिल्याने दोघांनी त्याच्याकडे खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. ३१) सायंकाळी पिंपरी येथे घडली.

प्रताप लक्ष्मण राजपूत (वय ३७, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल मुसळे, गोवींद घुले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पिंपरीत वाहन पार्कींगचा व्यवसाय आहे. पार्किंग व्यवसायात भागीदारी न दिल्याने आरोपींनी राजपूत यांना फोनवरून महिना २० हजार रुपये खंडणी देण्याची मागणी केली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.