भागीदारीच्या बहाण्याने 22 लाखांची फसवणूक

0
367

पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – कंपनीत भागीदारी देण्याच्या बहाण्याने चौघांनी 21 लाख 96 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार ऑगस्ट ते डिसेंबर 2021 या कालावधीत येशो हॉलीडेझ कंपनी, वाकड येथे घडला.

संग्राम कालबा आंधे (वय 45, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी 25 जुलै 2022 रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अखिलेश यादव उर्फ विकी (रा. पुनावळे), अजय आर्या (रा. हिंजवडी), दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी आणि इतर लोकांना येशो हॉलीडेझ कंपनीत 11 टक्के भागीदारी देतो असे आमिष दाखवले. त्यांचा विश्वास संपादन करून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांनतर कोणताही परतावा न देता धमकीची भाषा करून फिर्यादी आणि इतर लोकांची 21 लाख 96 हजार रुपयांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.