भागीदाराची फसवणूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा

0
724

पिंपळे सौदागर, दि. २५ (पीसीबी) – भागीदाराची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना म्हाळुंगे, पुणे तसेच पिंपळे सौदागर येथे घडली.

अधीर प्रभाकर पोतदार (वय 49, रा. सुतारवाडी, पुणे) यांनी सोमवारी (दि. 23) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिला आरोपी व सुमेश अतुल मोरे (वय 32, रा. कोथरूड, पुणे) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सप्टेंबर 2018 ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये म्हाळुंगे, पुणे येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी आणि फिर्यादी पोतदार यांनी एकत्रित या नॅस मायकोटेक नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीत 33.33 टक्के याप्रमाणे शेअर्स ठरवून दिले. कंपनीचे पेटंट तयार झाल्यावर महिला आरोपी यांनी संचालक पदाचा राजीनामा देऊन काम बंद केले. फिर्यादी पोतदार यांनी पाठपुरावा केला असता त्यांच्या असे लक्षात आले की महिला आरोपी हिने मंजूर झालेल्या पेटंट प्रमाणे नवीन पेटंट मंजुरीसाठी अर्ज केला आहे. फिर्यादी पोतदार यांनी त्यास विरोध केल्याने त्या पेटंटला अंतिम मंजुरी मिळाली नाही. याबाबत फिर्यादी यांनी आरोपी सोबत वेळोवेळी संपर्क करून मेल करून कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. आरोपी यांनी फिर्यादी यांच्या कंपनीसोबत स्थापन करण्यासाठी पेटंट बनवण्यासाठी वापरलेला रिसर्च डेटा याची चोरी करून नॅस मायकोटेक या कंपनीचा राजीनामा देऊन नॅस मायकोटेक कंपनीसाठी तयार वापरलेल्या रिसर्च डाटा, पेटंट हे कवाक ग्रीन टेक या नावाने दुसरी कंपनी सुरू करून त्याच्या मार्फतीने पेटंट प्रोडक्ट तयार करून त्याचा आर्थिक हिस्सा फिर्यादी यांना न देता आरोपी यांनी कंपनी स्थापन करण्यासाठी फिर्यादी यांनी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीचा अपहार केला आहे. तसेच कंपनी मार्फत खरेदी केलेल्या साहित्याची, रिसर्च डेटा यांची गोपनीय माहिती चोरी करून त्याचे पेटंट डाटाची माहिती चोरुन फिर्यादी यांच्या संमतीशिवाय दुसरी कंपनी स्थापन करण्यासाठी वापरून आर्थिक फसवणूक केली.