भागीदारांच्या आर्थिक त्रासाला कंटाळून संचालकाची आत्महत्या

0
10379

खेड, दि. १६ (पीसीबी) – शेतजमिनीवर कर्ज घेता यावे यासाठी कंपनीच्या संचालक मंडळावर घेतले. संचालक बनवून नवीन संचालकाच्या मालमत्तेवर कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतले. ते कर्ज फेडण्याची हमी घेऊन देखील कर्ज न फेडता संचालक भागीदाराला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 13 ऑक्टोबर रोजी सकाळी खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथे घडली.

संजय विष्णू नाणेकर (वय 53, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) असे आत्महत्या केलेल्या संचालकाचे नाव आहे. याप्रकरणी ऋषिकेश संजय नाणेकर (वय 26) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिषेक दिवाकर त्रिवेदी (रा. मोशी), महिला, अमित दिवाकर त्रिवेदी (रा. मोशी), दिवाकर त्रिवेदी (रा. नागपूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील संजय नाणेकर यांच्या नावावर असलेल्या जमिनीवर कर्ज काढता यावे, यासाठी आरोपींनी प्रीपॅक इंटरकॉन्टीनेंटल प्रा ली या कंपनीच्या संचालक मंडळावर घेतले. संजय नाणेकर यांना संचालक बनवून त्यांच्या नावावर असलेल्या जमिनीवर आरोपींनी सन 2018 मध्ये शरद सहकारी बँकेकडून एक कोटी 90 लाख रुपये कर्ज घेतले. ते कर्ज भरण्याची जबाबदारी आरोपींनी घेतली. सुरुवातीला काही हप्ते आरोपींनी भरले. मात्र सन 2020 पासून हप्ते भरणे आरोपींनी बंद केले.

त्यामुळे बँकेकडून संजय नाणेकर यांना विचारणा होऊ लागली. संजय नाणेकर यांनी आरोपींना कर्ज भरण्याबाबत वारंवार विनंती करण्यात आली. मात्र आरोपींनी ते कर्ज भरले नाही. या त्रासाला कंटाळून आरोपींनी 13 ऑक्टोबर रोजी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत