भाऊसाहेब भोईर यांनी सांगवीतून केला प्रचाराचा शुभारंभ 

0
58

चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी माझ्याकडे मास्टर प्लॅन तयार – भाऊसाहेब भोईर

चिंचवड मतदार संघ भ्रष्टाचार मुक्त करणे हा माझा मुख्य उद्देश – भाऊसाहेब भोईर

सांगवी, दि. 06 (पीसीबी) : चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी सांगवी येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करत प्रचाराचे रणशिंग फुंकले. या प्रसंगी सांगवीतील महिलांनी भाऊसाहेबांचे औक्षण करून त्यांचे मोठ्या मनाने स्वागत केले. त्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून नागरिकांच्या समस्यांना जाणून घेत पदयात्रेला सुरुवात केली. यावेळी सांगवीतील नागरिकांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाऊसाहेबांनी सांगवीतील नागरिकांशी संवाद साधत, नागरिकांच्या भेटीगाठी केल्या. त्याच बरोबर त्यांनी सांगावी परिसरातील राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

सांगवी परिसरात प्रचारा दरम्यान नागरिकांनी आणि महिला भगिनींनी भाऊसाहेब भोईर यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर मतदारांच्या घरी जावून प्रत्यक्ष भेटी गाठी घेवून सुसंवाद साधला. दरम्यान स्वतः लोकांनी प्रचारात सहभागी होऊन व्यथा मांडल्या त्या नक्कीच आपण सोडवून घेवू असा शब्द भाऊसाहेब भोईर यांनी दिला. एकंदरीत सांगवी परिसरातून भोईर यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

भोईर या प्रसंगी म्हणाले की भ्रष्टाचार मुक्त शहर करणार आहे. ” पिंपरी चिंचवडसाठी नैर्गिकदृष्टया महत्वाच्या असलेल्या तीन नद्या  इंद्रायणी पवना व मुठा या  प्रदूषणमुक्त झाल्या पाहिजेत. पाण्याचे फवारे मारून प्रदूषण नियंत्रणात आणता येत नाही. त्याला प्रत्यक्ष कार्य करून उपाय योजना करावी लागते. लोकांनी माझी कार्य करण्याची क्षमता आणि पार्श्वभूमी पाहून मतदान करावे आणि नक्कीच लोकं माझ्या पाठीशी उभे आहेत. केवळ विकासाचा दिखाऊ पणा करून चालणार नाही. प्रत्यक्ष काम झाले पाहिजे. शहरात जो भ्रष्टचार बोकाळला आहे. दहशत फोफावली आहे. ती थांबवणे गरजेचे आहे. मी आमदार झालो तर पहिल्यांदा भ्रष्टाचार मुक्त शहर करणे हा मुख्य उद्देश पूर्ण करीन” .