भाऊसाहेब भोईर यांनी पिंपळे सौदागर येथील नागरिकांच्या गाठीभेटी घेवून साधला संवाद

0
44

पिंपळे सौदागर, दि. १३ – चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी आज सकाळच्या सत्रात पिंपळे सौदागर येथील नागरिकांच्या गाठीभेटी घेवून त्यांच्याशी मनमोकळेपणे सुसंवाद साधत नागरिकांच्या समस्या तसेच अडीअडचणी समजून घेतल्या. पिंपळे सौदागर वासियांना रोज भेडसावणारे प्रश्न त्याच बरोबर त्यांच्या मनातील भावना समजून घेवून त्यांच्याशी भोईर यांनी समाधानकारक चर्चा करून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असा पिंपळे सौदागर येथील नागरिकांना शाब्दिक आधार दिला. पिंपळे सौदागर येथील नागरिक म्हणाले की आम्ही पूर्ण ताकदीनिशी भाऊसाहेब भोईरांच्या पाठीशी असून आम्ही भोईर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

या प्रसंगी भाऊसाहेब भोईर म्हणाले की सर्वधर्म समभाव आणि निक्षपाती भावना मनात ठेवून मी सदैव समाजकारण आणि राजकारण करत आलो आहे. पिंपळे सौदागरचा विकास झपाट्याने झाला आहे. उद्योगधंद्यासाठी तसेच नोकरी निमित्ताने या भागात परप्रांतीय तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले अनेक नागरिक वास्तवास आहेत. आता या ठिकाणी ते नागरिक पिंपळे सौदागरचे रहिवासी म्हणून सध्या या भागात राहत आहेत. या सर्वांची एक मोट बांधून मी त्यांच्याशी संवाद साधत आहे. आज तेथील सर्व नागरिकांना भेटून मला आनंद झाला त्यांच्या सुखदुःखात मी नेहमी सामील होईल असे भोईर यांनी पिंपळे सौदागर येथील नागरिकांशी बोलताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

ते पुढे म्हणाले की मी भ्रष्टाचार मुक्त शहर करणार आहे. ” शहरातील पिंपरी चिंचवड शहराला नैसर्गिक वरदान लाभले आहे. येथील नद्या, झाडे जवळपास असणाऱ्या टेकड्या यांचे संवर्धन होणे काळाची गरज आहे. तसे पाहिले तर या भागात वाहतूक कोंडी, वाहनांचे प्रदूषण, अस्वच्छ नद्या हे प्रश्न गंभीर बनत चालले आहेत हे सोडवण्यासाठी मी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. हवेत अथवा रस्त्यावर पाण्याचे फवारे मारून प्रदूषण नियंत्रणात आणता येत नाही. त्याला प्रत्यक्ष कार्य करून उपाय योजना करावी लागते.

चिंचवड मतदार संघातील नागरिकांना माझी कार्य करण्याची क्षमता आणि पार्श्वभूमी माहित आहे. गेल्या तीन दशकांचा समाजकारण आणि राजकारणाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. मला विकासाची कामे करायचे आहेत. त्यामुळे मी ही निवडणूक लढवत आहे. केवळ विकासाचा दिखाऊ पणा करून चालणार नाही. प्रत्यक्ष काम झाले पाहिजे. शहरात जो भ्रष्टचार बोकाळला आहे. दहशत फोफावली आहे. ती थांबवणे गरजेचे आहे. मी आमदार झालो तर पहिल्यांदा भ्रष्टाचार मुक्त शहर करणे हा माझा उद्देश आहे.

कृष्णाजी भिसे, नितिन काटे, संतोष काटे, शहाजी काटे, जगन्नाथ काटे, माऊली काटे, प्रमोद काटे, दिगंबर जगताप, मिलिद काटे, बाळासाहेब काटे, अर्जुन काटे, दिलीप काटे, सचिन झिंजूडे, मच्छिंद्र काटे, उत्तम धनवटे, सिताराम भालेकर, धोंडिबा काटे, संजयू काटे, बाळासाहेब काटे, हेमंत काटे, संतीष हांडे आधी नागरिकांच्या भेटी घेऊन भाऊसाहेब भोईर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.