चिंचवड मतदार संघातील थेट लढत ही कपाट विरुद्ध कमळ होणार आणि ‘ कपाट ‘ वरचढ ठरेल – सांगवीतील नागरिकांचे निर्भिड मत
अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर हे निश्चित विजयी होतील ! पदयात्रेत सहभागी झालेल्या लोकांच्या भावना
चिंचवड, दि. १८ : चिंचवड विधानसभेचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी आज शेवटचा डाव टाकत आपण रेसमधून असून आपण ही रेस जिंकणार हे सिद्ध केले आहे. भोईर यांनी सांगवी भागातून आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला होता त्याच भागातून आज भव्य पदयात्रा काढून प्रचाराची सांगता केली. त्यानंतर भाऊसाहेब विविध राजकीय बलाढ्य मंडळींना भेटून नियमाप्रमाणे आपल्या प्रचाराची सांगता करत आहेत. तत्पूर्वी आज संपन्न झालेल्या पदयात्रेची सुरुवात वसंतदादा पाटील पुतळा येथून झाली. त्यानंतर जुनी सांगवी, ढोरे नगर , क्रांती चौक , शितोळे नगर , काटे पुरम चौक , पीडब्ल्यूडी ग्राउंड , डायनासोर गार्डन , संविधान चौक , पिंपळे गुरव साई चौक इत्यादी भागात झालेल्या पदयात्रेत लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
चिंचवड विधानसभा मतदार संघातून तिरंगी लढत होईल असे सुरुवातीला वाटत होते. परंतु प्रचार जस जसा अंतिम टप्प्यात येत गेला तसा अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी आपले राजकीय कौशल्य दाखवत प्रचारात आघाडी घेतली. मतदारसंघातील वेगवेगळ्या जाती धर्माच्या संस्था संघटनांनी पुढे येवून भाऊसाहेबांना भेटल्या आणि जाहीर पाठिंबा दिला. चिंचवडकरांना आपल्या हक्काच्या माणूस विधानसभेत गेलेला आवडेल म्हणून चिंचवडच्या मतदारांनी भाऊसाहेब यांच्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आहे. कपाट या चिन्हाचा एकहाती मतदार चिंचवडमध्ये तयार झाला आहे. तसाच मतदार पिंपळे सौदागर आणि सांगवीतील भागात तयार झाला पाहिजे म्हणून विशेष प्रचार यंत्रणा कार्यरत आहे. आज सांगता समारंभाची याच भागातील भव्य पदयात्रा हा त्याचाच भाग होता.
आजपर्यंतच्या प्रचारात वापरलेली रणनिती त्याचे फलित भाऊसाहेबांच्या आजच्या पदयात्रेत दिसून आले. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून सांगवी आणि पिंपळे गुरव मधील नागरिक भाऊसाहेबांचे स्वागत करीत होते. याचाच अर्थ भाऊसाहेब भोईर यांना लोकांनी आमदार म्हणून स्वागत करायला सुरुवात केली आहे. असे चित्र रस्त्यावर आज दिसून आले. चिंचवडमधील थेट लढत कमळ विरुद्ध कपाट अशीच होत असून कपाट कमळावर भारी पडेल अशा भावना पदयात्रेत सहभागी झालेल्या लोकांनी यावेळी व्यक्त केल्या.
” भाऊसाहेब भोईर म्हणाले की आज प्रचंड संख्येमध्ये लोकं माझ्या पाठीशी उभे राहिली आहेत. लोकांना आता चिंचवडमध्ये बदल हवा आहे. म्हणून बदल घडविणे गरजेचे असल्याने आज देखील लोकं माझ्या पदयात्रेत सहभागी होते. मतदार मतदारसंघातील अनेक शक्तिशाली नेते अप्रत्यक्ष कपाट चिन्ह निवडून येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांची नावे आत्ताच सांगणार नाही. पण काही संस्था आणि संघटनांनी प्रत्यक्ष मीडिया समोर येऊन मला जाहीर पाठिंबा देत आहेत. हे तर सर्वश्रुत आहे. आज प्रचाराच्या तोफा थंडावतील पण येथील समस्या नागरिकांच्या अडी – अडचींना घेवून जनतेच्या मनात जी खदखद आहे. ती मला विजयी करूनच संपेल” असे मत भोईर यांनी व्यक्त केले.