महाळुंगे, दि. १५ ( (पीसीबी))
भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला सहा जणांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. १३) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आंबेठाण येथे घडली.
गणेश बबन पडवळ (वय ३०, रा. आंबेठाण, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन तानाजी पडवळ (वय ३३), सुरेश तानाजी पडवळ (वय ४२), माधव सुदाम डावरे (४०), किरण माधव डावरे (३५), अनिल राजपूत (वय ३५), अर्जुन (वय ४०) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या शेतात जात असताना त्यांच्या भावाला आरोप मारहाण करीत होते. त्यामुळे फिर्यादी भांडण सोडविण्यासाठी गेले. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी गजाने मारून दुखापत केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.