भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचे बोट कोयत्याने तोडले

0
76

वाकड, दि. 4 (पीसीबी)

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करत तरुणाचे बोट कोयत्याने तोडले. ही घटना एक नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता वाकड येथे घडली.
दिपूकुमार वूपेंद्र खरवार (वय 27, रा. वाकड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्या आहे. त्यानुसार चैतन्य नागनाथ माने (वय 20, रा. काळेवाडी), मन्या उर्फ विशाल मनोहर कांबळे (वय 22, रा. थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील फिनिक्स मॉलच्या पाठीमागील बाजूने कुमरेश बिकाऊ सहानी हा जेवण घेऊन घरी जात होता. त्यावेळी आरोपींनी त्याला मारहाण केली. हे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी गेले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीवर कोयत्याने वार केले. यामध्ये फिर्यादी यांच्या हाताचे बोट तुटले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीस बेल्टने मारहाण केली. पोलिसांनी चैतन्य माने याला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.