भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मुलाला बेदम मारहाण

0
139
fight

पिंपरी, दि २२ जुलै (पीसीबी) चिखली,

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय मुलाला तिघांनी बेदम मारहाण केली. मुलाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक मारून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 20) रात्री नऊ वाजताच्या सुमारास रुपीनगर, तळवडे येथे घडली.

याप्रकरणी जखमी 17 वर्षीय मुलाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संस्कार सतीश यलशेट्टी (रा. रुपीनगर तळवडे), ऋषिकेश विजय चव्हाण (वय 19, रा. राहुलनगर, निगडी) आणि एक अनोळखी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश जाधव आणि आरोपी संस्कार व त्याच्या दोन साथीदारांची भांडणे सुरू होती. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेला. त्यावेळी तू आमच्या भांडणात का येतोस, असे म्हणून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यानंतर त्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून गंभीर जखमी केले. पोलिसांनी आरोपी ऋषिकेश चव्हाण याला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.