पिंपरी, दि. २१ (पीसीबी)
भांडण सोडवल्याच्या रागातून एका व्यक्तीने महिलेला मारहाण केली. ही घटना १९ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता निराधार नगर, पिंपरी येथे घडली.
अस्लम शेख (रा. निराधार नगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अस्लम याने फिर्यादी यांच्या भावासोबत भांडण केले. त्यामध्ये अस्लम याने फिर्यादी यांच्या भावळआ शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. हे भांडण फिर्यादी यांनी सोडवले. त्या कारणावरून आरोपीने फिर्यादी यांना छातीवर, पोटावर लाथेने मारहाण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.