भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्थी केली म्हणून एकाला रॉडव दगडाने बेदम मारहाण

0
386

भोसरी, दि. १५ (पीसीबी) : एकाच कंपनीत काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये झालेली भांडणे सोडवणे तिसऱ्या कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे,. मध्यस्थी केल्याचा राग म्हान धरून चार ते पाच जणांनी एकाला लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.13) एमआयडीसी भोसरी येथील एजिओ फार्मा लि. या कंपनीत घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी संकेत दिलीप बनसोडे (वय 23 रा. भोसरी), गणेश अंबादास बाघचौरे (वय 18 रा. एमआयडीसी भोसरी) यांना अटक केली आहे तर त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी सिरेश प्रभाकर जैन (वय 49 रा. निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे काम करत असलेल्या कंपनीतच आरोपी हे काम करतात. दरम्यान आरोपी संकेत व कंपनीतील मनी भुषण यांचे भांडण झाले. हे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी यांनी मध्यस्थी केली व संकेतला समजावून सांगितले. याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ कऱण्यास सुरुवात केली. तसेच मी तुला जिवंत सोडणार नाही म्हणत लोखंडी रॉडने जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर मारहाण करत गंभीर जखमी केले. तसेच त्याच्या इतर साथीदारांना मोठ्याने आवाज देऊन पकडा याला म्हणत पोटात व छातीवर दगडाने मारहाण करत गंभीर जखमी केले. यावरून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दोघांना अटक केली असून आरोपींवर खूनाच्या प्रत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.