भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला म्हणून तरुणाला बेदम मारहाण

0
313

भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तरुणाला टोळक्याने बेदम मारहाण केली आहे, हा प्रकार सोमवारी (दि.25) हिंजवडी येथील पवेला रेस्टॉरंट अन्ड बार येथे घडली आहे.

याप्रकरणी श्रेयस शरद केदारी (वय 19 रा.लवळे,मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून ओंकार लालासाहेब काटे (वय 25 रा.चिंचवड), रोशन राजेंद्र राणे (वय 23 रा.चिंचवड), प्रथमेश लालासाहेब टिपाले (वय 24 रा चिंचवड) व अनिकेत जयदेव जाधव (वय 24 रा.चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवेला या रेस्टे व बारमध्ये दोन गटात बाचाबाची सुरु होती. यावेळी आरोपी हे दुसऱ्या गटाला मारण्यासाठी जातअसताना फिर्यादी यांनी त्यांना अडवले व मारहाण न का करु इथे मुली आहेत असा समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलांनी फिर्यादीलाच शिवीगाळ करत बांबूने मारहाण करत जखमी केले. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.