भांडणात समजवावून सांगितले म्हणून तरुणाला व त्याच्या घरच्यांना मारहाण

0
472

मावळ, दि. २५ (पीसीबी) – भांडताना समजावून सांगितल्याचा राग आल्याने चार ते पाच जणांनी तरुणाला व त्याच्या घरच्यांना मारहाण केली आहे.ही घटना रविवारी (दि.24) मावळ मधील नवलाख उंब्रे येथे घडली.

शुभम विलास मराठे (वय 29 रा.नवलाख उब्रे) याने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सागर बबन शेटे , बबन हरीभाऊ शेटे, अमोल रामदास वाळूंज, समीर बबन शेटे व एक अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या भाडेकरूला समीर शेटे याने शिवीगाळ केली . यावेळी फिर्यादी यांनी समीरला समजावून सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने इतर साथीदारांना बोलावून फिर्यादी, त्यांची आई, बहिण, वहिनी यांना काठीने व हाताने मारहाण करत दमदाटी केली.यावरून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.