भांडणात मध्यस्थी केल्याने मित्रावर ब्लेडने वार

0
77

काळेवाडी, दि. 16 (पीसीबी) : भांडणात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून मित्राने मित्रावर ब्लेडने वार केले. ही घटना रविवारी (दि. 15) दुपारी दीड वाजताच्या सुमारास कोकणेनगर, काळेवाडी येथे घडली. प्रशांत नागेश जाधव (वय 27, रा. कोकणेनगर, काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चेतन उर्फ सुजल कोरे (वय 20), सागर शिंदे (वय 22, दोघे रा. काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर शिंदे हा फिर्यादी जाधव यांचा मित्र आहे. सागर आणि प्रशांत सोनवणे यांचे भांडण सुरू होते. त्या भांडणात जाधव यांनी मध्यस्थी केली. त्यावेळी जाधव यांनी सागर याच्या कानाखाली मारली. त्याचा राग आल्याने सागर आणि चेतन यांनी जाधव यांना जिवे मारण्याची धमकी देत ब्लेडने वार केले. यामध्ये जाधव गंभीर जखमी झाले आहेत. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.