भांडणात मध्यस्थी करणा-यावर खुनी हल्ला

0
112

सांगवी, दि. ०१ (पीसीबी) : भांडणात मध्यस्थी करणा-यावर धारदार हत्याराने वार करीत खुनी हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. 29) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पिंपळे गुरव परिसरात घडली.

व्हेलारे जेकब अ‍ॅन्थोनी (वय 25, रा. संजय पार्क, विश्रांतवाडी, पुणे) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. 30) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विघ्नेश गुणशिलन रंगम (वय 25), अखिल ऊर्फ भोल्या (वय 22) आणि चिराग घागड (वय 22, तिघांचाही पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी विघ्नेश यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अ‍ॅन्थोनी हे रिक्षा चालक आहेत. ते आपला मित्र सोहेल मुलानी याच्यासोबत रिक्षातून चालले होते. त्यावेळी आरोपींनी रिक्षा थांबविली. सोहेल यांच्याशी पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी सोहेल याला मारहाण करण्यास सुरूवात केली. यामुळे फिर्यादी अ‍ॅन्थोनी हे भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेले. त्यावेळी चिडलेल्या आरोपींनी आम्ही याला मारणार होतो. आता तुलाच संपवतो, असे म्हणत फिर्यादी यांच्या कपाळावर धारदार शस्त्राने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.