भांडणात मध्यस्थी करणा-यावर तलवारीने वार

0
113

हिंजवडी, दि. 16 (प्रतिनिधी)
भांडणात मध्यस्थी करणा-यावर कोयत्याने वार केले. ही घटना मंगळवारी (दि. 13) दुपारी म्हाळुंगे स्मशानभूमी येथे घडली.

संतोष रघुनाथ शेडगे (वय 46, रा. राम मंदिरासमोर, म्हाळुंगे, ता. मुळशी, जि. पुणे) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी बुधवारी (दि. 13) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार समशेर अली आणि समीर गंगाराम जाधव (वय 21, रा. केतकावळे, शिरवळ, जि. पुणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समशेर आणि मुन्ना जाधव यांची भांडणे सुरू होती. या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी फिर्यादी संतोष शेडगे हे गेले. त्यावेळी आरोपी समशेर याने त्याच्या जवळील कोयत्याने मुन्ना जाधव याच्या डोक्यावर कोयत्याने वार करीत त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपी समीर जाधव याने त्याच्या जवळील तलवारीने फिर्यादी शेडगे यांच्यावर वार करून गंभीर जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.