भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावर चाकूने वार

0
493

मोशी, दि. २५ (पीसीबी) – नवरा बायकोच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या नातेवाईकावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना सोमवारी (दि. 23) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास बोऱ्हाडेवाडी मोशी येथे घडली.

भैय्यासाहेब रघुनाथ वाघमारे (वय 37, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. बाळासाहेब पिराजी शिंदे (वय 23) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वाघमारे हा फिर्यादी यांच्या मावशीस मारहाण करत होता. यामुळे फिर्यादी, त्यांचे आई-वडील, मामा नाथराव कांबळे असे आरोपी वाघमारे यांची भांडणे सोडवण्यासाठी गेले होते. त्यावेळेस आरोपी फिर्यादी यांच्या मामाला ‘तू कोण आहेस? तुला काय करायचे?’ असे म्हटला. त्यावेळी फिर्यादी यांचा मामा ‘मी तुझा बाप आहे,’ असे म्हणाला. त्यावेळी आरोपी याने चिडून जाऊन घरातील वापरातील सुरी घेऊन फिर्यादी यांच्या मामावर चाकूने डाव्या हाताच्या पोटरीवर वार करून गंभीर जखमी केले. फिर्यादी हे त्यांचे भांडण सोडवीत असताना आरोपीने स्वतःच्या हातावर चाकूने मारून जखमी करून तेथून पळून गेला.