भवानी मातेचा अपमान करणाऱ्या अवधूत वाघ यांचा संभाजी ब्रिगेडकडून निषेध

0
194
  • माफी मागा अन्यथा गुन्हा दाखल करणार.

उद्धव सेनेची निवडणूक निशाणी असलेल्या मशाल चिन्हावर नुकत्याच प्रसारित करण्यात आलेल्या मशाल गीतावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला असून यातील हिंदू व जय भवानी हे दोन शब्द वगळा अशी नोटीस उद्धवसेनेला पाठवलेली आहे.याप्रकरणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलदैवत असून महाराष्ट्राची अस्मिता देखील आहे. त्यामुळे हे शब्द वगळणार नाही प्रसंगी कोर्टात जाऊ अशी भूमिका देखील घेतली आहे.

या गीतात हिंदू तुझा धर्म जाणून घे मर्म,जीव त्यास कर तू बहाल. हे कडवे आहेत तर कोरस मध्ये ‘जय भवानी जय शिवाजी’ हे शब्द आहेत.यातील हिंदू व जय भवानी शब्द निवडणूक आयोगाला खटकले आहेत. याच प्रकरणाला धरून केवळ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर उपरोधिक टिका करण्यासाठी तसेच याला राजकीय रंग देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी आपल्या @Avadhutwaghbjp या ट्विटर अकाउंट वरून जय भवानी मधील भवानी ही तुळजापूरची भवानी माता नसून दिल्लीच्या जनपथ वरील इटली माता आहे,असे ट्विट करत श्री तुळजाभवानी मातेचा इटलीची माता म्हणून अतिशय घाणेरडे राजकारण करण्याच्या प्रयत्नात संपूर्ण महाराष्ट्राची आराध्य देवता श्री तुळजाभवानीची विटंबना केली आहे.भाजपाच्या अवधूत वाघांना त्यांचे राजकारण त्यांनाच लखलाभ असो परंतु या राजकारणामध्ये महाराष्ट्राची अस्मिता तुळजाभवानीचा इटलीची माता म्हणून अवमान करत असाल तर आम्ही हे कुठल्याही परिस्थितीत सहन करणार नाही,याप्रकरणी अवधूत वाघ यांनी लवकरात लवकर संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी तसेच सदर ट्वीट आपल्या अकाउंट वरून काढून टाकावे अन्यथा अवधूत वाघ यांच्या वरती आमची अस्मिता असलेल्या हिंदू देवदेवतांचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यासाठी आम्ही कोर्टात जाऊ असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला.

तसेच या सर्व अवमानकारक ट्विट प्रकाराबद्दल बुद्धी घाण ठेवलेल्या ह्या अवधूत वाघाचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर निषेध करण्यात आला. या प्रसिद्धी पत्रकावर शहराध्यक्ष सतीश काळे प्रदेश संघटक वैभव जाधव पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण,सचिव रावसाहेब गंगाधरे,संघटक अभिषेक गायकवाड,वसंत पाटील,संतोष शिंदे यांच्या सह्या आहेत.