भर रस्त्यात महिलेचा विनयभंग

0
411

वाकड, दि. ११ (पीसीबी) – रत्स्यावर थांबलेल्या महिलेला ‘माझी टाईमपास होशील का, अशी विचारणा करत विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. 10) दुपारी वाकड रोड येथे घडली.

नागेश भंडारी (वय 19) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास सुदर्शन कॉलनी वाकड रोड येथे थांबल्या असताना आरोपी तिथे आला. त्याने फिर्यादी यांना माझी टाईमपास होशील का, असे विचारले. फिर्यादीने आरोपीला नकार देऊन त्यांच्या पतीला बोलावले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी महिलेशी वाद घालून त्यांच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला. तिथून जाताना आरोपीने माझे नाव नागेश भंडारी आहे, तुला बघून घेतो अशी धमकी दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.