भर दिवसा बंद घरात घरफोडी, अडीच लाखांचा ऐवज चोरीला

0
108

चिखली, दि. २८ (पीसीबी) : भर दिवसा बंद घराचे कुलूप तोडून घरातून रोख रक्कम व दागिने असा अडीच लाखांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि.26) सकाळी दहा ते सायंकाळी साडेसहा या कालावधीत शिवाजीनगर चिखली येथे घडली.

याप्रकरणी सयाजी शहाजीराव माने (वय 50 रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर कुलूप बंद होते. यावेळी आरोपीने घराचे लॉक कशाच्या तरी साह्याने तोडले घरात प्रवेश करत घरातील कपाटातून 90 ग्रॅम वजनाचे 2 लाख 25 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच 16 हजार रुपयांचे रोख रक्कम असा एकूण दोन लाख 41 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. चिखली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.