भर दिवसा दुचाकी चोरणाऱ्या तरुणास अटक

0
374

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – हॉटेलच्या पार्किंग मधून भर दिवसा दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 8 नोव्हेंबर रोजी दुपारी भोसरी येथील दावत हॉटेलच्या समोर पार्किंग मध्ये घडली होती.

राहुल संभाजी माळवे (वय 23, रा. उदापूर, ता. जुन्नर, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अजय विठ्ठल पवार (वय 24, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी शनिवारी (दि. 18) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय पवार यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14/जेझेड 8037) भोसरी मधील दावत हॉटेलच्या पार्किंग मध्ये पार्क केली होती. 8 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते चार वाजताच्या कालावधीत एका तरुणाने राहुल यांची दुचाकी चोरून नेली. पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या राहुल माळवे याला अटक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.