भर दिवसा घरफोडी करून एक लाखाचे दागिने पळवले

0
293

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – घरफोडी करून चोरट्यांनी घरातून एक लाख आठ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. १३) सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजताच्या कालावधीत एमआयडीसी भोसरी येथे घडली.

याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या घराला कुलूप लावून कामासाठी बाहेर गेल्या. सायंकाळी पाच वाजता त्या घरी आल्या असता त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले आणि दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातून एक लाख आठ हजार रुपये किमतीचे २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.