भर चौकात तरुणावर पालघन व कोयत्याने वार, पिंपरीतील धक्कादायक प्रकार

0
1126

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – भेटायला बोलवून एका तरुणावर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने पालघन व कोयत्याने वार केले आहेत. हा धक्कादायक प्रकार पिंपरी येथे मंगळवारी (दि.26) सायंकाळी 7 च्या सुमारास आंबेडकर चौकात घडला.

याप्रकरणी हनुमंत रघुनाथ जाधव (वय 54 रा .वाकड ) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी बालाजी उर्फ यमराज जगताप (वय 38 रा .देहूरोड) व त्याचे आठ ते दहा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.यामध्ये अमित हनुमंत जाधव (वय 28) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा अमित हा त्याच्या इतर चार मित्रासह त्यांचा जुना मित्र आरोपी बालाजी याला भेटण्यासाठी आंबेडकर चौकात गेले होते. यावेळी बालाजी यानेच अमितला भेटण्यासाठी बोलावले होते. तिथे गेल्यानंतर आरोपीने अमितला शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहाण केली, तसेच इतर साथीदारांना बोलावून हाच तो आमित त्याला सोडू नका मध्ये कोण आले तर मी बघतो असे म्हणत ,एकाने कोयत्याने तर दुसऱ्याने पालघन याने अमितच्या हातावर व बरगडीवर वार केले. यामध्ये आमित गंभीर जखमी झाला आहे. आरोपी वार केल्यानंतर तेथून दुचाकीवरून पळून गेले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.