भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

0
373

चाकण, दि.१८ (पीसीबी) – भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने एका दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना चाकण-शिक्रापूर रोडवर शुक्रवारी   (दि. १७) मध्यरात्री एक वाजता घडली.

विशाल मंगेश सावके (वय २२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गौरव हेमंत सारसकर (वय २५, रा. बाणेर, पुणे) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी एमएच १२/एलजे ६८९५ क्रमांकाच्या वाहन चालकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव आणि त्यांचा मित्र विशाल हे दुचाकीवरून चाकण-शिक्रापूर रोडने जात होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगात आलेल्या वाहनाने गौरव यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात विशाल यांच्या डोक्यात गंभीर दुखापत होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर गौरव यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर वाहन चालक वाहन सोडून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.