दि.१२ (पीसीबी) भरधाव वेगाने दुचाकी चालवणाऱ्या एका तरुणाचा अपघात झाला असून त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (९ ऑगस्ट) रात्री पिंपळे सौदागर येथील मॅक्स शोरूम समोर घडली.वेदांत बबन मुसने (२३, वरुण पार्क सोसायटी, पिंपळे सौदागर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय थोरात यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांत मुसने हा कोकणे चौकाकडून भोसरीच्या दिशेने केटीएम बाईक (एमएच २३/बीबी०७०७) भरधाव वेगाने चालवत जात होता. मॅक्स शोरूम समोरील बीआरटी विलगकच्या रेलिंगला दुचाकी धडकल्यामुळे त्याचा अपघात झाला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.